Posts

विवर विवरण.

  विवर विवरण.   एके दोवाशी गावात नवल वर्तले. बाबू शेळकेच्या शेतात एक भोक उगवले. हा बाबू म्हणजे तद्दन रड्या माणूस. पृथ्वी वरचे सर्व मानव रडेच. जगी ह्या खास रड्यांचा पसारा माजला सारा. बाबूची देवाकडे एकच कम्प्लेन, “बाकी सगळे श्रीमंतीत लोळताहेत मी मात्र गरीब का. तर त्या रात्री हायपर स्पेस मधून प्रवास करणाऱ्या कुणा यक्स एलिएनने बाबू चे रुदन ऐकले आणि तो स्वतःशीच हसला. याक्सीन बाजूच्या सीटवर बसली होती. “काय रे, आज लई हसतो आहेस.” यक्सने आपला हेड फोन तिला दिला, “तूच ऐक.” “मुझको भी तो लिफ्ट करा दे.” अब सुनिये बाबू रडवेल्याने गाया एक रडगान, "जो भी चाहूं वो मैं पाऊं ज़िंदगी में ज...

टाईम मशीन.

  अविनाश हार्डीकर! हा माझा जीवश्चकंठश्च मित्र. बालपणापासून. त्याच्या नावातही जादू आहे. म्हणजे असं पहा. हार्डीकर! मधला हार्डीचा संबंध थेट केम्ब्रिजच्या गणिती हार्डी शी तर हार्डीकर! मधला हार्दिक पांड्या तर तुम्हाला माहीत” असणारच. पण हार्डीकर! मधली हार मात्र त्याने कधीही मानली नाही. कर म्हणजे करच असा त्याचा बाणा होता. तो स्वतःचे नाव उद्गारवाचक चिन्हांसकट लिहित असे आणि दुसऱ्यानीही तसच लिहावे असा त्याचा आग्रह असे. कुणी जर त्याला “अरे हार्डीकर” म्हणून ओरडूनही हाक मारली तर ती त्याला ऐकू जात नसे, पण तेच जर कुणी त्याला मुंबईच्या कोलाहालात हळुवार “अरे हार्डीकर!” असे संबोधले   तर लगेच ऐकू जाणार. असो. हार्डीकर! लहानपणापासून नवीन नवीन उपकरणे बनवण्यात वेळ घालवणारा होता. त्याने वयाच्या नवव्या वर्षी दहा काचांचे   शोभादर्शक बनविले होते. वयाच्या एक वर्ष पुढेच. आम्ही पण शोभादर्शक बनवले होते पण ते फक्त तीन काचांचे. थ्री डायमेंशनल. पुढे त्याने सिलीकाचा स्फटिक वापरून रेडीओ बनवला. माझ्या समोर बॅटरीचे सेल लावून तो म्हणाला, “प्रभ्या, आता ऐक मुंबई अ स्टेशन लागेल.” रेडीओने खरखर करून घसा साफ के...

असेही एक मिशन!

  त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईन मध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले. “बाबा, परत केव्हा येणार?” “प्रिया, जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं”. कौमुदी म्हणजे प्रियाची आई आणि राबर्टोची पत्नी. हो ती अगदी मराठी होती. “बरं प्रिया, सांग तुला काय आणू?” “मी मागितलं तर आणाल? तर मग चाँदवा, मुठभर चांदणे घेऊन या. गिव मी माय मूनशाईन.” “डन!.” तो मिशन वरून परत आला तेव्हा त्याला हे सगळे आठवत होते. “प्रिया आहा. बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे.” प्रिया   दुडू दुडू धावत आली. त्याने मुठ उघडली. हजारो सूर्यांपेक्षांही तेजस्वी प्रकाशाने आसमंत झाळाळले. Brighter than thousand Suns! एका प्रचंड स्फोटाने दाही दिशा थरथरल्या. आणि नंतर मिट्ट काळोख.   मिशनवर जायच्या आधी सात दिवस क्वारंटाईनमध्ये जावे लागते. हेतू हा कि कोणताही अवकाश यात्री ऐनवेळी आजारी पडल्यामुळे मिशन पुढे ढकलायला लागू नये. एकूण तिघे जण होते. केके, राबर्टो, आणि शर्ली.. राबर्टोची   अवकाशातली ही दुसरी भरारी होती. शर्लीची पहिली. केके मात्र अनुभवी होता. म्हणूनच तो मिशन कमांडर होता. मिशनचे उद्...

काकडेच्या खुन्याची कथा.

  काकडेच्या खुन्याची कथा. तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते. आपल्याला कोण सुपारी देतोय, काय म्हणून सुपारी देतोय, ज्याची सुपारी दिली जाते आहे तो काय प्रकारचा माणूस आहे असले विचार मनात आणले तर धंदा करणे मुश्कील. बळी विषयी मन कस निर्विकार पाहिजे. एकदा त्याने एका सामाजिक कार्यकर्त्याला उडवले होते. त्या बाबाचा आश्रम-अनाथाश्रम होता. ती जागा दादाला पाहिजे होती. पण हा बाबा ऐकायलाच तयार नव्हता.(अर्थात हे त्याला नंतर पेपरात वाचल्यावर समजले.) त्याला काय वाटले असेल? काहीही नाही. जगात माणसे दररोज मरत असतात. त्यातलाच हा एक. दादाने बोलावणे पाठवले. आणि तो गेला. कुणा साहेबराव ...

फर्मी साहेबाची ऐसी तैसी

  तुम्ही कधी रात्री आकाशाकडे बघितले आहे काय ? अर्थात पुणे मुंबई सारख्या शहरांतून अशी अवस्था आहे की फक्त ठळक ठळक तेजस्वी दहा पंधरा तारे आणि चंद्र उगवला असेल तर तो , एवढेच आपण बघू शकता. जरा शहराच्या बाहेर दूर जाऊन आकाश पहा. आकाशगंगा अगदी स्वच्छ दिसेल.हे आकाश पाहून तुमच्या मनात काय विचार येत असतील. ते तुमच्या मूडवर अवलंबून आहे. मी जेव्हा अश्या आकाशाकडे बघतो तेव्हा मला माझ्या क्षुद्रपणाची प्रकर्षाने जाणीव होते. म्हणजे असे पहा पृथ्वीवर जितक्या चौपाट्या आहेत , त्या सर्व चौपाट्यांवरच्या वाळूच्या प्रत्येक कणामागे १०००० तारे ह्या विश्वांत आहेत.एकावर चोवीस शून्य द्या इतके तारे ह्या विश्वांत आहेत.थोडी गणिते करून खगोल शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे की विश्वांत कमीत कमी एक लाख आपल्यासारखे प्रगत समाज असतील. मग ह्या लोकांनी अजूनपर्यंत आपल्याशी संपर्क का साधला नाही ? “ सगळेजण गेले कुठे ?” सुप्रसिद्ध वैज्ञानिक एन्रिको फर्मी दुपारचे जेवण करत असताना एकदम उठून उभे राहिले आणि म्हणाले ,” “ सगळेजण गेले कुठे ?” फर्मीच्या ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. ‘ सगळेजण ’ म्हणजे फर्मीना ‘ परग्रहावरचे ...