Posts

ती व तो 2023

तो बहुराष्ट्रीय कंपनीत मनेजर होता तर ती एका राष्ट्रीय कंपनीत संगणकाशी छेडछाड करणारी होती. त्याचे लठ्ठ पॅकेज होते. फ्लॅट होता. लांबलचक गाडी होती. हुशार शोफर होता. अजून काय पाहिजे ? तर सांगायचा मुद्दा असा की उणीव होती फक्त एक श्रीमती की कलावती की सेवा करे जो पति की ज़रुरत है ज़रुरत है ज़रुरत है. सेवा करे जो पति की ? म्हणजे तिला काय तुम्ही नोकरांनी समजता ? काय हे प्रतिगामी विचार! पण एकूण पॅकेज भारदस्त असल्यामुळे प्रतिगामी विचार चालवून घ्यायचे. ती!! तिचे “ पॅकेज ” “ उंच , स्लिम आणि सौंदर्यपूर्ण ” होते. त्या दोघांची भेट अश्याच कुठल्यातरी सेमिनार प्रसंगी झाली. कुठला सेमिनार ? ते महत्वाचे नाही. ती पेपर वाचत होती. म्हणजे सेमिनारमध्ये वाचतात तसला “Bring together open source frameworks like PyTorch, TensorFlow and scikit-learn with IBM and its ecosystem tools for code-based and visual data science.” नाही. ती आपला “ टाईम पास इंडिया ” वाचत होती. ही तिची अदा त्याला फार भावली. त्याचा शोध तिच्यापाशी जाऊन थबकला. जिवा शिवाशी भेट होते त्यातलाच प्रकार. मध्यंतरात जेव्हा इतरेजन चहा पितापिता

शापित यक्ष!--१

I am Ubik. Before the universe was I am. I made the suns. I made the worlds. I created the lives and the places they inhabit; I move them here, I put them there. They go as I say, they do as I tell them. I am the word and my name is never spoken, the name which no one knows. I am called Ubik but that is not my name. I am. I shall always be. ------------Ubik-Philip K Dick त्याचे नाव ? पहा मला पण नेमकं आठवत नाही. काही तरी “ स ” ने सुरुवात होणारे होते. समीर ? सदानंद ? सज्जन ? सतीश ? सत्येन ? नाही. असं बंगाली वाटणारं निश्चित नव्हतं. नावात काय आहे ? आपण त्याला एक्स म्हणूया. हा माणूस – त्याला माणूस का म्हणायचे हा बाकी एक प्रश्नच होता- हा जन्मजात बावळट होता. त्याच्या बावळटपणाची लक्षण अगदी लहानपणापासून दिसायला लागली होती. एक्स कधीही रडला नाही. अगदी जन्माला तेव्हा देखील. केव्हढा हा बावळटपणा! इतर मुलांचे आई बाप मुलांच्या रडण्याला कावतात. इथं हा रडत का नाही म्हणून एक्सची आई वैतागलेली. दुसऱ्या आया तिचा हेवा करत. “ खरच कित्ती कित्ती गुणाचं बाळ. एकदा मणजे एकदाही आवाज नाही हो. ” एक्सच्या