विवर विवरण.
विवर विवरण. एके दोवाशी गावात नवल वर्तले. बाबू शेळकेच्या शेतात एक भोक उगवले. हा बाबू म्हणजे तद्दन रड्या माणूस. पृथ्वी वरचे सर्व मानव रडेच. जगी ह्या खास रड्यांचा पसारा माजला सारा. बाबूची देवाकडे एकच कम्प्लेन, “बाकी सगळे श्रीमंतीत लोळताहेत मी मात्र गरीब का. तर त्या रात्री हायपर स्पेस मधून प्रवास करणाऱ्या कुणा यक्स एलिएनने बाबू चे रुदन ऐकले आणि तो स्वतःशीच हसला. याक्सीन बाजूच्या सीटवर बसली होती. “काय रे, आज लई हसतो आहेस.” यक्सने आपला हेड फोन तिला दिला, “तूच ऐक.” “मुझको भी तो लिफ्ट करा दे.” अब सुनिये बाबू रडवेल्याने गाया एक रडगान, "जो भी चाहूं वो मैं पाऊं ज़िंदगी में ज...