Posts

Showing posts from July, 2024

Reality Show

    Statutory Quantum Warning! Studying Quantum Physics is injurious to health. It can induce strange uneasiness. You have been warned. Read further at your risk.     You can't take another person's observations at face value—your reality isn't necessarily theirs. You can't even trust your own observations from the past. We are on the Slippery Slope. But nobody said life in the Quantum Lane was going to be easy. This story, can you be sure that it really exists? Let us try to find out. “The Great Reality Show” is over. Or is it? Mother and son are coming out of theatre. “Ma, tell me. What are they doing right now?” “They who? Son.” “Why? Those movie people. When there was “The End” and the lights were switched on, those movie people just vanished. Where are they now?” This kid is precocious. The Mother is at least two thousand five hundred –if not more- years old. She probably can answer all the queries. But the kid wants to know more. “Oh,...

Carnival Of Souls

  कार्निवाल ऑफ सोल्स कार्निवाल ऑफ सोल्स हा एक विचित्र, अविस्मरणीय आणि विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात बनवलेला भीती चित्रपट आहे. ही चर्चमध्ये ऑर्गन वाजवणाऱ्या एका स्त्रीची करूण कहाणी आहे. (चित्रपटात नायक नाहीये. ह्या नायिकेच्याच भोवती हा चित्रपट बेतला आहे.) तिला एका अमानवी चेहेऱ्याने पछाडले आहे. नायिका नुकतीच एका जीवघेण्या अपघातातून वाचली आहे. मरणारच होती पण वाचली. मोटारगाडीतून मैत्रीणींबरोबर   प्रवास करताना तिची गाडी पुलाचा कठडा तोडून नदीत पडते. हा ह्या चित्रपटातील सुरवातीचा सीन आहे. सुरवात बघताना प्रेक्षकाला अशी भावना वाटते कि ह्या प्रिंटमध्ये काहीतरी गडबड आहे. आपण मधूनच सिनेमा बघत आहोत. चित्रपटगृहात उशिरा पोचल्यावर सिनेमा बघताना जसे वाटत असेल तसं काहीसं फीलिंग येते. सिनेमाची कथा जितकी विचित्र आहे तितकाच त्याचा इतिहास. चित्रपट नवख्या हौशी लोकांनी बनवला आहे ह्याची वारंवार जाणीव करून देणारा आहे. कृत्रिम अभिनय, ओठांची हालचाल आणि संभाषण ह्यातील तफावत, आडमुठे संपादन, कंटीन्यूटी मधल्या चुका. चित्रपटाची नायिका हीच कायती एकमेव प्रोफेशनल नटी आहे. काही समिक्षकांच्या मते ह्या असल्य...

भलत्या वेळी, भलत्या जागी -2

आमच्या आधीचे दोन पेशंट तिथे बसले होते. टेबलावर पेपरांची चळत पडली होती. एक जण ‘ प्रभात ’ वाचत होता. त्याने प्रभात टाकून सकाळ उचलला. बाबांनी चपळाईने प्रभातवर कब्जा केला. डायरेक्ट चौथ्या पानावरच्या काडीमोडच्या नोटीसा वाचायला सुरवात केली. “ आमच्या अशिलाने तुला एकूण चौदा पत्रे लिहिली. तू जी लग्नाच्या आठव्या दिवशी माहेरास निघून गेलीस ती आजतागायत नांदायला परत आली नाहीस. त्यामुळे आमच्या अशिलास लग्नाचा हक्क बजावता... ” घटस्फोटाच्या नोटीसा वाचून झाल्यावर बाबांनी जमीन खरेदी , साठेखत , खरेदीखत , जमिनीच्या चतुःसीमा , कब्जा ह्यांच्या नोटीसा आदिकडे मोर्चा वळवला. मी आपला “ सोविएत देश ” घेऊन चित्रं बघत बसलो. डॉक्टर तपासणी घरातून बाहेर पडले. त्यांनी पेशंटला औषध लिहून दिले. मग खुर्चीत बसून त्यांनी सकाळ वाचायला घेतला. अर्ध्या तासांनी डॉक्टरांचा आणि बाबांचा दोघांचे पेपर वाचन संपले. दोघे एकमेकांकडे बघून हसले. चला माझी केस एकदाची ऐरणीवर येणार म्हणून मला बरं वाटलं. प्रभातने वारा घेत बाबा म्हणाले , “ कैच्या काही गरम होतंय. नाही का ?” डॉक्टरांनी बराच विचार केला , “ एल् निनो. त्याचे प्रताप आहेत. ” आता ...