जीवू
“जीवू, आज माझी काही अपॉइंटमेंट आहे?”
जीवू हा त्याचा जीवश्चकंठश्च असा मित्र कम पर्सनल असिस्टंट रोबो.
“यस्स सर. आज तुम्हाला डॉक्टर बगाराम, हार्ट स्पेशिअलिस्ट M.D. FRCP.
ह्यांची भेट घ्यायची आहे. संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी. रात्री नऊ
वाजता “ला थाळी” मध्ये क्लाएंट बरोबर डिनर.”
“दोनी अपॉइंटमेंटसाठी ड्रेस कोड प्रमाणे कपडे तयार आहेत?”
“माझी सूचना अशी आहे कि डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी कॅज्युअल आणि डिनरसाठी कॅज्युअल एलेगंट असा ड्रेस ठीक राहील.”
“जीवू, तू नसतास तर माझे काय झाले असते. अजून एक मे महिन्यात आराम करण्यासाठी गोव्याला जाईन म्हणतो. त्याची बुकिंग करुन टाक.”
“त्याची गरज नाही.”
“का?”
“का ते डॉक्टर तुम्हाला आज समजाउन सांगतील.”
Comments
Post a Comment