प्रसिद्धी
प्रसिद्धी

प्रसिद्धीसाठी काय केले नाही.
क्रिकेट मध्ये सेन्चुरी मारली.
लोक म्हणाले, “ पाटा पिच असणार.”
कथा लिहिल्या.
लोक म्हणाले, “ पकाऊ आहेत.”
कविता केल्या.
लोकांनी नाकं मुरडली, “ टाकाऊ आहेत.”
लेख लिहिले.
लोक म्हणाले, “ विकाऊ आहेत.”
आदळाआपट केली.
लोक म्हणाले, “ आडमाप आहे.”
कपडे फाडले.
लोक कुत्सितपणे म्हणाले, “ आहेरातले असणार.”
गाढवावर उलटे बसून, तीन पाट काढून, स्वतःची वरात काढली.
लोक म्हणाले, “आता मात्र ह्याला वेड लागले.”
पिऊन धिंगाणा घातला.
लोक खवळले, चप्पल घेऊन धावले, “ ह्याच्या आयला------”
मग प्रेम केले.
प्रतिसाद मिळाला.
लोक आश्चर्यचकित झाले , “ व्वा, वाटले नव्हते. शेवटी बाबल्याने आयुष्यांत काहीतरी केलं बरं का !”
पण ते ऐकायला उरलोच नव्हतो मी.
आता उरलो फक्त प्रेमा पुरता!

Comments
Post a Comment