सेकंड क्लास वेटिंग रूम.

 

आता मी ओरिजिनल English Diction देतो. मी बराच मिर्च मसाला लावून लिहिले आहे. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तसेच ही Diction गुगालायला सोपी पडेल.

One of the following is true:

• Every breath you take contains an atom breathed out by
Marilyn Monroe.
• There is a liquid that can run uphill.
• You age faster at the top of a building than at the bottom.
• An atom can be in many different places at once, the equiva-
lent of you being in New York and London at the same time.
• The entire human race would fit in the volume of a sugar cube.
• One percent of the static on a television tuned between sta-
tions is the relic of the Big Bang.
• Time travel is not forbidden by the laws of physics.
• A cup of coffee weighs more when it is hot than when it is
cold.
• The faster you travel, the slimmer you get.

No, I’m joking. They are all true!
As a science writer I am constantly amazed by how much stranger
science is than science fiction, how much more incredible the Uni-
verse is than anything we could possibly have invented.
कुणाला काही चांगले मटीरिअल मिळाले तर इथे सगळ्यांसाठी पोस्ट करा.

 

https://www.misalpav.com/node/51833

एक वाट पहाणे.

 

आज हॉस्पिटलचा दिवस. थोडी तयारी केली. एक जुनी फाईल शोधून जवळ घेतली. त्यात कुणा डॉक्टरच्या गिचमिडी हाताने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन होते.

कसलीतरी टेस्ट करायची होती. का? डॉक्टरला काहीतरी संशय आला होता म्हणून.

हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर ला कुणा स्वागतिकेला विचारायची गरज नव्हती ला सगळे प्रोसिजर माहित होते. लिफ्ट पकडून मी ज्या मजल्यावर जायचे होते तेथे गेलो. काऊंटरवर जाऊन पैसे भरले. फी दणदणीत होती. रोग होताच तसा लई भारी. काऊंटरवालीने सांगितले, “ह्या रूममध्ये जाऊन थांबा.

एकूण चार तास वाट पहावी लागेल म्हणाली.

पाण्याची बाटली आणली आहे?”

हो ही काय.

छान. वाट पहा. नर्स बाई येईल आणि सांगेल. तवर थांबा.

तिथे ज्या रूम मध्ये मी वाट पहात बसलो होतो तेथे एसी जाम रोरावत होता. मी स्वेटरवगैरे काही बरोबर घेतले नव्हते. मग काय ला वाजायला लागली थंडी. कुड कुड कुड...

नर्सबाई सगळ्यांना शिरेत औषध देण्यासाठी सुई लावत होती. माझी वेळ आली तर तिला बिचारीला माझी शीरच मिळेना. वैतागली. म्हणाली, "असे कसे हो तुम्ही? हात नीट ढीला सोडा, थरथरू नका. घाबरलेत कि काय? काय वय आहे?"

 

त्याने वय सांगितले.

"बरोबर कुणी आहे?"

"नाही."

"कुणीतरी पाहिजे ना?"

"बरोबरचे लोक पुढे गेले आहेत."

"मग काय एकटेच? खायला कोण घालतं?"

मी बोट वर करून दाखवलं. माझ्या शेजारी एक सुंदरी बसली होती. खुदु खुदु हसत होती. त्यामुळे मला उत्साह आला.

"नर्सबाई, मला एक सांगा. हे तुमचे मशीन अजून किती वर्ष आयुष्य उरलं आहे ते सांगते काय हो? नाही म्हणजे मला सेन्चुरी मारायची आहे."

सगळे हसायला लागले. बाबा जोक करणारा आहे. त्या नंतर नर्सने सगळ्यांच्या पाण्याच्या बाटलीत औषध टाकून दिले.

हळू हळू एक तासात पिऊन टाकायचे.

सगळ्याना शिरेतून काहीतरी औधध टोचले.

वातावरणातील तंगी सैल झाली. माझे काम झालं. मग सगळे बोलायला लागले. उत्साहाने एकदुसर्याची विचारपूस करायला लागले.

प्रत्येकाची अलग अलग स्टोरी. थरारक अनुभव. पण प्रत्येकाला विकेटवर जेव्हाढावेळ टिकता येईल तेव्हढा वेळ टिकून खेळायचं होतं.

तुम्ही कसे इकडे?” त्याने शेजारी बसलेल्या भिडूला विचारले.

काय विचारू नकोस बाबा, सोळा पासून इकडे येतो आहे. ही टेस्ट पाचव्यांदा करतो आहे...त्याला सगळे रोग होते. कुठला नाही असे नाही.

माझे पाच डॉक्टर आहेत. ह्यासाठी हा, हार्टसाठी हा. स्टेंट बशिवला आहे. शुगर साठी वेगळा. हिप मधून गोळा काढला. ती सर्जरी ह्याने केली. मग लंघ्जमध्ये काहीतरी दिसलं. ती सर्जरी आपल्या ह्या त्याने केली. काय ग त्याचे नाव?” त्याने मुलीला विचारले.

मुलीने नाव सांगितले.

हा तोच तो. एकदम भारी. छोकरा आहे. पण हुशार! बर का.

मी सगळी माहिती टिपकागदासारखी टिपून घेत होतो.

काळजी करू नकाहो. होईल सारं व्यवस्थित.

तर काय. हिप मधला गोळा काढला तर डॉक्टर काय म्हणाला माहित आहे?”

काय म्हणाला?”

हाडा पासून एक सूतच दूर होता. नाहीतर कमरेपासून सगळा पाय काढावा लागला असता.

अरे बापरे!

देवानेच वाचवले. त्यानेच गोळा दिला, त्यानेच काढायची बुद्धी दिली. देव अशी लपाछप्पी खेळतो. तवा मी देवाला विसरलो होतो. त्याने इंगा दावला. म्हणाला बच्चमजी... आता नेमाने पारायणे करतो.

पण पाच पाच डॉक्टर म्हणजे...

हो हो. एक म्हणतो रोज किमान पाच किलो मीटर तरी चालायला पाहिजे तर दुसरा म्हणतो. हार्टवर ताण द्यायचा नाही, जिन्याने जायचे नाही. लिफ्ट वापरायची, मग मी काय करतो, रोज पाच किलो मीटर चालतो आणि सोसायटीमध्ये घरी जायला लिफ्ट वापरतो. ताई तुम्ही कुठून आलात?”

मग ती ताई आपली कर्म कहाणी ऐकवते. सगळे लक्ष देऊन ऐकतात, मध्ये मध्ये प्रश्न करतात.

त्याचा त्रास होतो काय?”

तर. भूक कमी होते. केस झडतात. इम्यूनिटी खलास, सारखे टेन्शन. दर महीन्याला चाळीस पन्नास हजारांचा फटका. फायदा काही नाही. म गोळ्या बंद केल्या. पण नवरा आणि मुलाने इमोशनल ब्लाक्मेल केल. मग वाटलं नाही अशी हार मानायची नाही. पुन्हा आले टेस्ट करायला. पण इथे आले तुम्हा सर्वांना भेटलं कि उत्साह येतो. वाटत रोज येऊन गप्पा माराव्यात. बॅटरी चार्ज करून घरी जायचं.

टेस्टिंग सुरु व्हायला वेळ होता. तो पर्यंत औषधी पाण्याची बाटली संपवायची होती.

डाव्या बाजूला बसलेल्या सुंदरीला, “पोरी तुला काय झालं?” असं विचारायची  माझी हिम्मत झाली नाही.

तेव्हढ्यात त्या मल्टीपल रोग्याच्या मुलीने खाली जाऊन सगळ्यांसाठी वडा पाव आणले.

सगळ्यांनी सगळ्या कॉशन फाट्यावर मारून वडापाव वर ताव मारला.

आता सगळे वाट पहात राहिले.

नंबर केव्हा येणार ह्याची.

नंबर आला कि जायचं.

र म्हणा च्यायला आणि मारा सिक्सर. खेळ पुढे चालू ठेवा..

zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
माझ्या नाकाच्या शेंड्यावरची पेशी, करोडो वर्षापूर्वी डायनासोरच्या शेपटीच्या टोकावर  होती.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
आमचे यान त्या निळ्या ग्रहावरती चकरा मारत होते.
त्यांना वाटत होते कि आम्ही त्यांचे शत्रू आहोत. आम्ही त्यांना खूप समजाऊन सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकायला तयारच नाहीत.
उलट त्यांनी त्यांच्याकडची सगळी अण्वस्त्र आमच्यावर डागली.
आमच्या यानाचा कप्तान वैतागला. त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता.
ते अस्त्र साधेच होते.
त्या ग्रहावरच्या अणूंमधली सर्व पोकळी त्याने शोषून घेतली.
कप्तान साहेबाच्या टेबलावर एक सेंटीमीटर क्यूब होता.
संपूर्ण मानववंश त्यात सामावून गेला होता.

Comments

Popular posts from this blog

कवटीत भुस्सा भरलेली माणसे. -२

आले,आले. पॉप कॉर्न परत आले भाग-२

काकडेच्या खुन्याची कथा.