Posts

Showing posts from January, 2024

"ते लोक."

“लोचा” मी जेव्हा प्लांट मध्ये काम करत असे त्यावेळची ही कथा आहे. परब माझ्या शिफ्टमध्ये काम करत असे. माझे आणि परबचे एक अतूट नाते होते. परब जो एकदा माझ्या शिफ्ट मध्ये आला त्यानंतर तो कधीही दुसऱ्या शिफ्टमध्ये गेला नाही. कसं असतना कि ऑपरेटर आणि शिफ्ट इंजिनिअर हे अधून मधून बदलत असतात. सर्व साधारणपणे कोण ऑपरेटर कामचुकार आहे, कोण शिफ्टमध्ये झोपा काढतो, कोण ड्युटी चुकवून संडासात जाऊन झोपतो आणि कुणाची अक्कल गुढग्यात आहे ह्याची शिफ्ट इनचार्जला चांगली कल्पना असते. पण आमचा हा प्लांट असा डिझाईन केला होता कि प्लांटच्या कुठल्याही कोपऱ्यात माशी जरी शिंकली तरी सेन्ट्रल कंट्रोलरूम मध्ये अलार्म येणार. ही थोडी अतिशयोक्ति झाली म्हणा. सांगायचा मुद्दा हा कि जुन्या प्लांट्स मध्ये ऑपरेटरहा महत्वाचा दुवा असे, तसा तो ह्या प्लांटमध्ये नव्हता. म्हणून कोणी शिफ्ट इंजिनिअर ऑपरेटरबद्दल आग्रही नसत. कुणीही चालेल असा अटिट्युड असे. कुणीही चालेल पण हा परब नको ह्याबद्दल, का कुणास ठाव, सगळ्यांचे एकमत होते. माझा अपवाद सोडून. परबबद्दल लोकांना एव्हढी अनामिक घृणा का वाटायची हे कोडे मला कधी सुटले नाही. नंतर हळू हळू मला समजायल...

सेकंड क्लास वेटिंग रूम.

  आता मी ओरिजिनल English Diction देतो. मी बराच मिर्च मसाला लावून लिहिले आहे. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तसेच ही Diction गुगालायला सोपी पडेल. One of the following is true: • Every breath you take contains an atom breathed out by Marilyn Monroe. • There is a liquid that can run uphill. • You age faster at the top of a building than at the bottom. • An atom can be in many different places at once, the equiva- lent of you being in New York and London at the same time. • The entire human race would fit in the volume of a sugar cube. • One percent of the static on a television tuned between sta- tions is the relic of the Big Bang. • Time travel is not forbidden by the laws of physics. • A cup of coffee weighs more when it is hot than when it is cold. • The faster you travel, the slimmer you get. No, I’m joking. They are all true! As a science writer I am constantly amazed by how much stranger science is than science fiction, how much more incredible the Uni- ...

ओळखा पाहू.

 ओळखा पाहू.  खालीलपैकी एक विधान (स्टेटमेंट) सत्य आहे. पहा  तुम्हाला ओळखता येत आहे का. १.तुम्ही घेतलेल्या प्रत्येक श्वासात एक अणू  मधुबालाने(इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही  नटाचे/नटीचे/व्यक्तीचे नाव टाकू शकता. उदा.  शहरुखखान) टाकलेल्या निश्वासातला  असतो. २.एक द्रव्य (liquid) असेही आहे की जे उतारावर  वाहण्याऐवजी चढावर वाहू शकते, म्हणजे नदी  सागराला मिळण्याऐवजी हिमालयाकडे  माहेरी परत  जाते जणू. ३.लग्न करताना तळमजल्यावर काम करण्याऱ्या  मुला/मुलीशी पहिली पसंती द्या कारण त्यांचे वय हळू  हळू वाढत असते. तसेच पहिल्या मजल्यावरची  सदनिका घ्या. म्हणजे तुम्ही बरीच वर्षे तरुण रहाल.   ४. अणु एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतो.  (म्हणजे तुम्ही ऑफिसात काम करा. आणि त्याच  वेळी प्रिये बरोबर थियेटर मध्ये सिनेमा बघू शकता.  असे आहे का? ओह माफ करा, सध्या हे आपल्या  सारख्या मर्त्य मानवांना शक्य नाही. पण अणु हे करू  शकतात. आणि आपण सरते शेवटी अणुनेच बनलो  आहोत. तेव्हा भविष्यात हे शक्य होईल. मग उगाच...