कॉस्मिक सेन्सॉराशिप भाग -१
कॉस्मिक सेन्सॉराशिप भाग -१ ccccccccccccccccccccccccccccccccccccccc ‘ भारत लार्ज हॅड्रान कोलायडर ” केवळ पुण्याचेच नव्हे तर आशियाचे गर्वस्थान आहे. डॉक्टर राघवेंद्र करमरकर आणि त्यांच्या टीमला आत्मविश्वास आहे/होता की युरोपातल्या CERN च्या एलएचसी प्रेक्षा थोडा मोठा , म्हणजे जवळपास तीस किलोमीटर परीघ असलेला बीएलएचसी , अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल. ““ अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल. ”” डॉक्टर शास्त्री विषण्णपणे हसले. ते डॉक्टर करमरकरांच्या समोर बसले होते. शास्त्री नुकतेच जीवघेण्या अपघातातून केवळ नशिबानेच वाचले होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल अकरा दिवस बेशुद्धावस्थेत इस्पितळात पडून होते. सगळ्यांनीच आशा सोडून दिली होती. पण कोमातून ते सही सलामत परत आले. दोन शस्त्रक्रिया झाल्यावर ते चालायला लागले होते. कुबड्यांच्या मदतीने का होईना पण ते चालायला लागले.. सहा महिन्यानंतर ते आज प्रथम प्रयोगशाळेत आले होते. “ स्वागत आहे , शास्त्रीजी. कशी आहे तब्येत ? डॉक्टरांनी फिरायची परवानगी दिली का ?” डॉक्टर करमरकरांनी डॉक्टर शास्त्रींचे स्वागत केले. डॉक्टर शास्त्रींच्य...