मानव आणि रोबोट
मानव आणि रोबोट ही कथा पाचहजार वर्षांपूर्वी मीच लिहिलेल्या ‘ रोबोट: कथा आणि व्यथा ’ ह्या कथा संग्रहातून घेतली आहे. हा कथासंग्रह पाचव्या मितीत( Fifth Dimension) असल्यामुळे वाचकांना तो डाउनलोड करणे शक्य नाही. मीच इथे लिहित जाईन. रोबोही आता पाचव्या मितीत निघून गेले आहेत. तर मानव हे रोबोटपासून उत्क्रांत झाले ह्या रोबोर्वीन नावाच्या शास्त्रज्ञाच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. मानवाचे प्रोग्रामिंग त्याच्या जन्मापासूनसुरु होते. आधी नातेवाइक , मग शाळा , नंतर समाज हे महत्कार्य करत असतात. खर तर लहान मुले ही आइन्स्टाइन पेक्षा महान शास्त्रज्ञ , शेक्सपिअरपेक्षा महान लेखक असतात. त्यांचा सगळीकडे मुक्त संचार असतो. पण समाजाला हे परवडण्यासारखे नसते. त्यांच्या प्रतिभेला खच्ची करण्याची महत्वाची जबाबदारी शाळांवर असते. लहान मुलगी बारा तेरा वर्षांची होते तोपर्यंत ही प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण होते. त्यांच्यावर देव , धर्म , राष्ट्र , समाज , रूढी , रिती , जात पात ह्यांची जाणीव करून दिली जाते. हे प्रोग्रामिंग मानव बी इ , एम बी ए वगैरे पर्यंत पूर्ण होतं. हे कशासाठी करावे लागते ? कारण कारखाने , राजकारण इत्य...