असा मी असामी.भागो - एक अदृश्य माणूस
मी भानगौडा गोपाळगौडा पाटील. लोक मला भागो म्हणतात. नाव विचित्र वाटतंय ना. आमच्याकडे अशीच नाव असतात, पण हे “अदृश्य माणूस” हे प्रकरण काय आहे? तुम्ही काय नवीन शोध लावलाय आहे? म्हणजे असं काही रसायन शोधून काढलाय का कि ते प्यालं कि माणूस अदृश्य होतो. नाही तसं नाही. हे आपलं जन्मापासूनचं आहे. माझा जन्म झाला तेव्हाच मी अदृश्य झालो. दवाखान्यात जो गोंधळ. बाळ गेलं कुठं? कुणी पळविला तर नाही ना? आई रडायला लागली. मिडवाइफ़च्या तोंडचे पाणी पळाले. मग कुणीतरी बोलले, “अहो बाळ तर इथे आहे.” अशी गंमत झाली. आपलं एक आहे. जमेल तस जगायचं. जगायचा फारसा त्रास पण नाही. टेंशन नाही घ्यायचं. भागो लकी आहात बुवा तुम्ही. कस काय जमत तुम्हाला. आम्हाला गुरुमंत्र द्या ना असला तर. आहे. पण त्याचं काय आहे जो मंत्र मला सूट झाला तो तुम्हाला होईलच ह्याची खात्री नाही. प्रत्येकानं आपला मंत्र आपणच शोधून काढायचा. ते ठीक आहे. पण तुमचा मंत्र काय आहे तो तरी कळू द्या ना. झालं. हा झाला गायब. नाही नाही. मी इथेच आहे. माझा मंत्र ऐकायचा आहे ना. सांगतो. मी अखंड वाचत असतो. दिवस रात्र. काय जे हाताशी लागेल ते. निवड वगैरे काही नाही. काम...