सांता क्लॉज.
सांता क्लॉज. जानेवारी महिना सुरु होतोय न होतोय बबड्याचे बाबा बबड्याला दमात घ्यायला सुरुवात करतात. “बबड्या, अभ्यास कर. नाहीतर सांता क्लॉज रागावेल.” “बबड्या, काकांकडे चॉकोलेट मागायचे नाही. सांता क्लॉज बघतोय.” “बबड्या, बस झाले तुझे विडीओ गेम. बंद कर आता. नाहीतर...” बबड्या, हे करू नकोस आणि ते करू नकोस. अशाप्रकारे दाढीवाल्या सांता क्लॉजने बबड्याचे बाल्य पार कोमेजून टाकले होते. फुगे, कचकड्याच्या बाहुल्या, गाड्या (खेळण्यातल्या), साप शिडी, बॅटबॉल, नवा व्यापार आणि मागच्या वर्षी रुबिक क्यूब. ह्या असल्या खेळण्यांसाठी वर्षभर चॉकोलेटचा उपास! धिस इज नोट फेअर डील. बबड्याला वाटायचे कि हा सांता आहे ना तो आपल्या अतृप्त इच्छा आपल्यावर लादायचा प्रयत्न करतोय. त्याला वाटतंय कि बबड्याने सचिन सारखा क्रिकेटपटू व्हावे, म्हणून बॅटबॉल! अडाणीला लहानपणी नवा व्यापार खेळून मग मोठेपणी व्यापारामध्ये वीज कंपनी, एअरपोर्ट, धारावी कशी मिळवायची त्याचे ज्ञान मिळाले म्हणून नवा व्यापार! मी काय मागतो आणि हा काय देतो. “बाबा, तुम्ही का नाही मागत सांता क्लॉजकडे?” “काय मागू?” “आपल हेच, म्हणजे एक किलो ट...