काकडेच्या खुन्याची कथा.
काकडेच्या खुन्याची कथा. तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते. आपल्याला कोण सुपारी देतोय, काय म्हणून सुपारी देतोय, ज्याची सुपारी दिली जाते आहे तो काय प्रकारचा माणूस आहे असले विचार मनात आणले तर धंदा करणे मुश्कील. बळी विषयी मन कस निर्विकार पाहिजे. एकदा त्याने एका सामाजिक कार्यकर्त्याला उडवले होते. त्या बाबाचा आश्रम-अनाथाश्रम होता. ती जागा दादाला पाहिजे होती. पण हा बाबा ऐकायलाच तयार नव्हता.(अर्थात हे त्याला नंतर पेपरात वाचल्यावर समजले.) त्याला काय वाटले असेल? काहीही नाही. जगात माणसे दररोज मरत असतात. त्यातलाच हा एक. दादाने बोलावणे पाठवले. आणि तो गेला. कुणा साहेबराव ...