Posts

Showing posts from August, 2024

कवटीत भुस्सा भरलेली माणसे. -२

  गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी. एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक. “हलो, अनंत, मी परब. आठवतंय?” लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज. मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला. एका स्त्रीचा करारी आवाज ऐकू येत होता, “यू ब्लडी फूल...” डाव्या हाताकडे पाहिले तर तो आपल्या जागी व्यवस्थित दिसत होता. “सर, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? एक मिनिट, पाणी आणून देते. पाणी प्या म्हणजे बरं वाटेल.” माझी सेक्रेटरी शर्ली गोड आवाजात बोलत होती. तिने आणून दिलेले थंड गार पाणी प्यालो. थोडं बरं वाटलं. “शर्ली, काय झालं?” “सर, मी हे लेटर फायनल करून तुमच्या सहीसाठी आणलं होतं तर तुम्ही उजव्या हातानं सगळीकडे चाचपत होता. माझ्याकडे, सर, तुमचे लक्ष नव्हतं. मी क...