Being Sentimental.
Being Sentimental. मी आपला खुशाल सकाळचा चहा नाश्ता करण्यासाठी टपरीवर बसलो होतो. चहावाल्याने रेडिओवर हिंदी सिनेगीत लावलं होतं. मूड एकदम मस्त जमला होता. पण तुम्ही तुमच्या धूनमध्ये आनंदात आहात हे लोकांना आवडत नाही, देव सुद्धा त्यांच्या मदतीला धावतो. कसं ते पहा. मी चहाचे घुटके घेत होतो तर “सैय्या बेईमान...” हे गाणं वाजत होतं. तर आलाच तो. चुरगळलेला झब्बा पायजमा, डोळे तारवटलेले. झोप झाली नसणार. माझ्याच शेजारी येऊन बसला. जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की ओर भागता है हे कुणी तरी चुकून लिहीलं असणार. कारण इथे पळायची गरज नव्हती. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मोबाईल काढला. त्याला पाहिजे ते पान समोर आल्यावर. “एकस्क्युज मी सर, पण हा पत्ता जरा सांगणार का. कवाधरून शोधतो आहे.” “काय पत्ता आहे?” “भागो पाटील. गल्ली नंबर तीन. पुणेकर कॉलनी.” हायला हा तर मलाच शोधतो आहे. भागो सावधान. “पुणेकर कॉलनी तर हीच आहे. तीन नंबर इथून डाव्या हाताला वळून...” “अहो तिकडे चार चकरा मारून झाल्या पण भागो पाटील हे नाव कुणीही ऐकलेले नाही”. कसं ऐकणार? गल्लीच चुकीची आहे ना. “सॉरी, मला पण माहित नाही. चहा ...