द होल ट्रूथ!
जेव्हा पक्या मला रस्त्यात आडवा गेला तेव्हाच मला समजायला पहिजे होत कि आजचा दिवस काही आपला नाही. “चल, काहीतरी पिऊया.” “नकोरे. अगदी आत्ताच चहा पिऊन बाहेर पडलोय.” “मी कुठे म्हणतोय चहा घे म्हणून. काहीतरी थंडा घेऊ या. लस्सी, कोक, लिंबूपाणी किंवा अमृत कोकम. उन बघ काय राणरणतेय. फारा दिवसांनी पकड मध्ये आला आहेस. खूप गप्पा पेंडिंग आहेत.” दिवस मावळतीला आला होता. आता सुटका नव्हती. पक्या जे काय बोलेल ते ऐकायचे. “पक्या, राजकारण सोडून दुसरं काही बोलणार असशील तर येतो.” “माहिती आहे.” अखेर पक्या मला हॉटेलात घेऊन गेलाच. मला न विचारताच त्याने कोकची ऑर्डर पण दिली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून शेवटी तो वळणावर आला. “काल मी है ना ट्विटर—ओके—X वाचत होतो. बघतो काय तर एक ओपिनिअन पोल बघितला...” “आलास ना राजकारणावर शेवटी.” मी वैतागून बोललो. “राजकारण नाही रे बाबा. पोल अशाबद्दल होता कि ह्या स्ट्राला किती भोकं आहेत...” हातातल्या स्ट्राला बारकाईने न्याहळत पक्या बोलला. अच्छा ह्यासाठी कोक हं. “काय एकेक लोकं असतात. ह्यात पोल कसला घ्यायचा. ड्रिंकिंग स्ट्राला दोन भोकं. एक खाली आणि एक वर. खालून कोकाकोला आत ...