स्टीमपंक रोबोटिक्स
स्टीमपंक रोबोटिक्स डॉक्टर ननवरे बंगल्याच्या बागेत काहीतरी अचाट प्रयोग करत होते. त्यांनी जुन्या बाजारातून बरच काही लोखंडी सामान विकत आणले होते. त्यात काय नव्हते? त्यांत निरनिराळ्या गेजचे लोखंडी पत्रे होते, एम-५ पासून एम-३० पर्यंतचे बोल्ट होते, ओपन एंड, रिंग, सॉकेट, बॉक्स,आणि शेवटी अॅड्जस्टीबल असे स्पॅनरचे अनेक प्रकार. स्टील वायर्स. चेन्स, कप्प्या. बेअरीन्ग्स, पिस्टन आणि मॅचिंग सिलींडर, क्रॅंकशाफ्ट, क्रॅंकेस. आता मी कशाकशाची नावे लिहू डॉक्टरांनी मला ह्या सगळ्या स्टोरचा इन्चार्ज केलं. आणि हुद्दा दिला: भांडारगृह प्रमुख! स्टोरच्या व्यवस्थेसाठी त्यांनी “इंवेंटरी मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम” लागू केली. कोणत्याही वस्तूचा साठा धोकादायक पातळीच्या खाली गेला की मला नोटीस येत असे. डॉक्टरांनी मलाच चीफ परचेस मॅनेजर नेमले होते. समजा म-५ बोल्टचा साठा कमी झाला आहे असा कॉम्प्युटरने इशारा केला की “भांडारगृह प्रमुख”मी “चीफ परचेस मॅनेजर”मला बोल्ट खरेदी करण्याचं रिक्विझिशन पाठवत असे. एकदा काय झालं “चीफ परचेस मॅनेजर”मीनं काही सामान वेळेवर खरेदी केलं नाही. रोजच्या समन्वय बैठकीत “भांडारगृह प्रमुख...