Posts

तो लेखक होता

तो लेखक होता. तो कथा लिहित असे. मधून मधून एखादी कविताही लिहित असे. “चुकलेल्या वाटा.” हा त्याचा एकमेव कथासंग्रह होता. त्याच्या घरात त्याच्या शिवाय अजून दोन मेंबर होते. एक स्त्री आणि एक मुलगा. दुपारी चार वाजता तो तयार झाला.   कुठेतरी जायचे होते. कुठे? जिकडे वाट फुटेल तिकडे, जिकडे पाय नेतील तिकडे.   तो जायला निघाला तेव्हा ती स्त्री आणि तो मुलगा टीवी बघत होते. “मी जातोय.” Nobody said anything. जा, नका जाऊ, लौकर   ये. टेक केअर. काही नाही. कदाचित त्यांना ऐकू गेले नसावे. कोणीतरी बोललेही असेल पण मग ह्याला ऐकू गेले नसणार. टीवी फुल ब्लास्ट. हलकेच दरवाजा बंद करून तो बाहेर पडला. थोड्यावेळाने त्याच्या लक्षात आले कि आपण बस स्टॉपवर आलो आहोत. इतका वेळ शहाण्या मुलासारखं चूप बसलेले जग एकदम खवळून उठले. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे आवाज. हजारो माणसांच्या बोलण्याचा कोलाहल. -------- ------------- White noise. सफेद झूट. कुठे अर्थ शोधताय. बस मोकळीच होती. कुठे बसावे बरं? “हेलो, मी इथे बसू?” “बसा, कुठेही बसा. ही बस काही माझ्या बापाची नाही...” अरे बापरे. भारी काम दिसतंय. इथं नको. दूसरीकडं

इलाज नसलेला फीव्हर

इलाज नसलेला फीव्हर मी संध्याकाळचा चहा पीत बसलो होतो. तेवढ्यात माझा फोन थरथरायला लागला. बघतो तर काय पुष्पा वहीनींचा फोन! बहुतेक गरम गरम कांदापोहे तयार आहेत. या खायला असा निरोप असणार किंवा रात्रीचे जेवण इकडेच करा , अस आग्रहाचे निमंत्रण असणार. म्हणून मी उत्साहाने फोन उचलला. “ हॅलो , वहिनी कांदा पोहे... ” मला पुढे बोलू न देता वहिनी बोलू लागल्या , “ अहो बंड्या भावोजी , तुम्ही ताबडतोब इकडे निघून या पाहू. तुमचे मित्र पहा कसं वेड्यासारखे करताहेत. ह्यांचे मन दुपारपासून थाऱ्यावर नाही. ” “ वहिनी , काय प्रोब्लेम आहे ते तरी सांगा मला. ” “ तुम्ही येताय कि मीच ह्यांना घेऊन डॉक्टरांकडे जाऊ ?” “ आलो , आलोच. ” मामला गंभीर दिसत होता. दोन दिवसापूर्वीच तर पम्या मला भेटला होता. तेव्हा तर व्यवस्थित होता. एकदम काय झाले ? फटाफट कपडे करून मी पम्याच्या घरी पोचलो. बघतो काय तर पम्या टीवी समोर हातात रिमोट घेऊन बसलेला. झपाझप चानल बदलत होता. त्याचे माझ्याकडे लक्ष नव्हते. बाजूला कादापोह्यांनी भरलेली ताटली आणि कप भरून चहा होता. दोनीही थंडगार झालेले. “ ह्यांनी सकाळी जेवण सुद्धा केलेलं नाही. तेव्हा पासून रिमोट

अस्टेरॉइड २०१२DA१४

  millions of sleepless people staring in helpless terror at the incandescent sky; and then, low and growing, came the murmur of the flood. And thus it was with millions of men that night – a flight no whither, with limbs heavy with heat and breath fierce and scant, and the flood like a wall swift and white behind. And then death. —H. G. Wells, “The Star” फेब्रुअरी २०१३ जगातील खगोलशास्त्रज्ञ उत्सुकतेने अस्टेरॉइड २०१२ DA १४ची वाट पाहत होते. अस्टेरॉइड २९१२ DA १४चा शोध एका वर्षापूर्वी एका स्पॅनिश दंतशल्याने(!) लावला होता. तो हौशी आकाश निरिक्षक होता. स्पॅनिश वेधशाळेने टिपलेल्या आकाशाच्या फोटोंची तपासणी करत असताना हा लघुग्रह त्याच्या नजरेस पडला. अवकाशात असे लाखो लघुग्रह फिरत आहेत. त्याची रुंदी १५० फूट होती. ही देखील सर्वसामान्य गोष्ट होती. ह्यात काही नवल विशेष नव्हते. तरी देखील ह्या लघुग्रहाने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. कारण एक वर्षाने म्हणजे १५ फेबुअरी २०१३ रोजी हा पृथ्वीच्या जवळून म्हणजे फक्त १७००० मैल अंतरावरून जाणार होता. शास्त्रज्ञांनी ह्याच्या कक्षेचा अभ्यास करून हे भाकीत

पृथ्वीचे शत्रू

‘No matter what we do, an asteroid is going to wipe us out. So we should party hard and wreck the place!’ – to which Homer replies: ‘Yeah, why should the asteroid have all the fun?’ पृथ्वीची सध्याची (साल २०२०) लोकसंख्या आहे ७९६ कोटी आहे. लोक बिंदास जीवन जगतायेत. बिंदास जीवन जगायला माझी काही हरकत नाही. मी कोण हरकत घेणार ? कृपया गैरसमज नसावा. मला एवढेच म्हणायचे आहे कि आपला , आपल्या संस्कृतीचा , आपल्या या सुंदर धरतीचा विनाश अटळ आहे. तो कदाचित पुढील दहा वर्षात होऊ शकेल किंवा अजून लाखो वर्षात देखील होणार नाही. कोण आहे असा शत्रू जो आपल्या भोवती घिरट्या घालत आहे ? कोविड ? प्लेग ? भूकंप ? हवामान बदल ? छ्या. ह्या असल्या चिल्लर गोष्टींना मानव घाबरणार नाही. आमचे हुशार शास्त्रज्ञ ह्यावर सहज मात करतील. अगदी आत्ताच आपण कोविडला पुरून उरलो. आणि आपण काही डायनास्रॉर इतके मूर्ख नाही आहोत. किंवा पॉंपी शहराच्या रोमन नागरीकांसारखे अनभिद्न्य नाही आहोत. त्या बिचाऱ्यांना वेसुविअस ज्वालामुखीचे रौद्र स्वरूप माहित नसावे. पण आता प्रगत विज्ञानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञ ज्वालामुखीच्या उत्पाताच्या वेळ